चातुर्मासात आषाढी एकादशीपासून कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत क्षीरसागरात शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णू ह्या दिवशी हळूहळू जागे होतात. म्हणून ह्या एकादशीला प्रबोधिनी (देवऊठी) एकादशी असे खास नाव आहे. ह्या दिवशी भक्तमंडळी भजन, कीर्तन, गायन तसेच विविध वाद्यांचा गरज करतात. प्रथम मंत्रोच्चारांसह देवाचे आसन तसेच देऊळ फुलापानांनी, तोरणांनी सजवावे. देवाची पूजा करावी. प्रल्हाद, नारद, व्यास आदी भगवद्भक्तांचे […]