पचरंगा आणि गलगलचे लोणचे पंजाबमधील बहुतेक पदार्थ हे ‘शेतातून ताटामध्ये’ या प्रकारातील आहेत.बहुतांश स्वयंपाकघरामध्ये शेतातील ताजी भाजी बनविली जाते.लोणची,चटणी, ताजे दही, कोशिंबिरींचे वेगवेगळे प्रकार, ताक हे ताटात रोज चाखण्यास मिळतात.लोणच्याशिवाय पंजाबी थाळी पूर्ण होत नाही.पराठा, लोणचे आणि सोबत दही किंवा कोशिंबीर हा पंजाबमधील बहुतेक घरांमधील लोकप्रिय नाश्ता आहे. लोणची हा पंजाबी जेवणातील अविभाज्य घटक असल्यामुळे […]