आचार्य अत्रे हे रामदास फुटाणे(कवी) यांचे दैवत आणि स्वत: फुटाणेंनेही अत्र्यांच्याच मार्गाने जात विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. मुळातले ते चित्रकलेचे शिक्षक. राजकारणात रमले, चित्रपटसृष्टीत गेले, कविसंमेलने गाजवली, अनेक समित्यांवर काम केले. या प्रत्येक क्षेत्रात उमटवलेली मुद्राही ठसठशीत आहे. ‘सामना” या चित्रपटाची जन्मकथा आणि त्याने पुढे घडविलेला इतिहास विविध निमित्तांनी आजवर सांगून झालेला आहे. परंतु वात्रटिकाकार, […]