संकष्ट चतुर्थी आज अंगारक संकष्टी. कुठल्याही कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ज्या प्रदेशात चंद्रोदय होत असेल, ती तिथी ही संकष्ट चतुर्थी आणि माध्यान्हकाळी जिथे शुक्ल चतुर्थी मिळत असेल, ती विनायक चतुर्थी, असा याबाबतचा ढोबळ नियम. ५०-६० वर्षापूर्वी हा चतुर्थीचा शास्त्रार्थ ठरवितांना बरीच भवति न भवति होत असे. चतुर्थी तृतीया तिथीने युक्त असली की तिला मातृविद्धा आणि पंचमी […]