माझ्या वडिलांना चाफ्याची फुले फार आवडत. मला हिरवा चाफाही फार आवडतो. पण अलीकडे हिरव्या चाफ्याची फुले फारशी पाहायला मिळत नाहीत.आमच्या घरापुढे मोठी बाग होती आणि एक पारिजातकाचे सुंदर झाड होत. रोज पहाटे झाडाखाली फुलांचा सडा पडायचा. सकाळी उठले की, प्रथम मी फुले वेचायला धावायची आणि पारिजातकांचा फुलांचा हार गुंफायची. तशाच आमच्या बागेत जाईजुईंच्या वेलीही होत्या. मला जाईच्या फुलांचा हार गुंफायला फार […]
