गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने […]
