थोक्कुलू, कोसंबरी आणि पेरुगू पच्छडी तेलंगणा हे राज्य ब्रिटिश काळात हैदराबाद-दख्खन रियासतेचा भाग होते. या भागातील लोणच्यांवर उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पाकपद्धतींचा प्रभाव पाहायला मिळतो. या भागातील बोलीभाषा तेलुगू असल्यामुळे आंध्र प्रदेशाचाही प्रभाव इथल्या खाद्यसंस्कृतीवर पडलेला पाहायला मिळतो. तेलंगणामध्ये लोणच्याला पच्छडी, थोक्कुलू, थोक्कू, ऊरगाय तर निजामशाही जेवणात त्याला अचार म्हणतात. दख्खनी आणि तेलुगू भागातील लोणच्यांच्या चवीत खूप फरक […]