कवचकुंडले ही भीती ची भीती या भावनेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. एका अर्थाने भीती ही माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात आल्यापासून त्याच्यामागे पडछायेसारखी वावरते आहे. प्राण्यांमध्ये आजही आदिम अवस्थेतील अस्तित्वाची भीती टिकून आहे. माणूस प्रगत झाला, आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न झाला, तरी भीती काही त्याची पाठ सोडायला तयार नाही. भीतीसारखी निरपेक्ष दुसरी भावना नसेल कदाचित. देश, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, वर्ण, वर्ग, […]