हळद – मसाल्यांची राणी मसाल्याच्या पदार्थांपैकी एक प्रमुख पदार्थ म्हणजे हळद. हळदीवर होणाऱ्या नवनवीन संशोधनातून तिचे अद्भुत गुण आता उजेडात आले आहेत. विज्ञानानुसार हळद त्वचेसाठी, रक्तशुद्धीसाठी, रक्ताभिसरणासाठी उत्तम तर आहेच शिवाय, सूक्ष्म जीवाणूरोधक, अंतर्दाहनाशक आणि बुरशीनाशक आहे. यातील ‘कुरक्युमीन’ या उच्च अँटीऑक्सिडंटमध्ये अनेक अद्भुत गुण आहेत. भारतात अनेक शतकांपासून रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर होत आहे. एवढेच नाही, तर जखम लवकर […]
