वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे आहे. त्याला ‘वटसावित्री व्रत’ असे देखील म्हटले जाते. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे. अश्र्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव ‘सावित्री’चं ठेवले. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी […]