कर्म, उपासना आणि ज्ञान भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या साधनत्रयीवर सर्व विचार संप्रदायांचा भर आहे. त्यातही कोणी (पूर्वमीमांसा) कर्माला प्राधान्य देतात, वैष्णव मत उपासनेला महत्त्व देते, तर उत्तरमीमांसा (अद्वैतमत) ज्ञानास श्रेष्ठ मानते. यामधील मतांतरे आणि तरतमभावविचार बाजूला ठेवला तर या साधनत्रयींना दिलेली मान्यता सर्वमान्य आहेच. अर्थात, त्यातही कोणी […]