या देवी सर्वभूतेषु ‘निद्रा’ रूपेण संस्थिता

कोणतीही गोष्ट सहज मिळाली,की त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि जेव्हा तीच गोष्ट मिळेनाशी होते, तेव्हा तिचे महत्त्व समजू लागते.झोपेच्या बाबतीतही तेच दिसून येते.मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.आरोग्यसंपन्न जीवनाचे जे तीन आधार आयुर्वेदात सांगितले आहेत, त्यात झोपेचा समावेश आहे. यावरूनच झोपेचे महत्त्व लक्षात येऊ शकते.झोप म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा प्राह्रश्वत होणारी […]

निद्रानाश

झोप ही सर्व मनुष्यांना व सर्व प्राणिमात्रांना निसर्गाने दिलेली एक अमोल देणगी आहे व ती एक महत्त्वाची शारीरिक व मानसिक गरज आहे. भूक व तहान यांसारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी थोडी अधिक मेहनत किंवा कष्ट घ्यावे लागतात. परंतु झोप ही मात्र कशीही कुठल्याही जागी (बसल्या-बसल्यासुद्धा) सहज मिळणारी, पूर्ण विश्रांती देणारी व हुशारी आणि हुरूप देणारी सुखावस्था […]