श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला. वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । । हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या […]