आज नवरात्रीचा सातवा दिवस. आज आपण श्रृंगारमयी अशा देवीचे स्तवन करणार आहोत. आपण शब्दफुलांची आरास मांडून नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीला वेगळ्या रूपात पाहत आहोत. तिचे स्तवन करून तिला विनम्र भावाने वंदन करीत आहोत. नवरात्रीनिमित्त हा शब्दोत्सव मांडलेला असल्यामुळे इथे श्रद्धेचा भाग आहेच, पण देवीकडे पाहण्याचा विविध स्वरूपांचा दृष्टिकोन रोज वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त होत असल्यामुळे देवीची […]
