माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात […]
