दागिने | Jewellery Care | Tips and Tricks | Safety | Swati Lagu

रत्नजडित दागिन्यांची काळजी- स्वाती लागू

  दागिने हा बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आता हे कशापासून बनविलेले आहेत म्हणजे सोन्याचे, मोत्याचे, पोवळ्याचे, हिऱ्याचे की इतर मौल्यवान रत्नांचे आहेत, तसेच ते कुठल्या प्रकारचे आहेत, तो सोन्याचा घसघशीत हार आहे, नाजूक माळ आहे, मोत्यांचा पेशवेशाही दागिना आहे, आधुनिक प्रकारचा हार आहे, हिऱ्याचा नेकलेस, त्याचबरोबर कुडी की झुंबर की रंगीत रत्नांचे दागिने आहेत, ह्यावरून […]

बाहेरगावी जाताना झाडांची निगा

प्रत्येकास आपली स्वतःची अशी बाग असावी अशी इच्छा असते. फळझाडे नसली तरी किमान फुलझाडे तरी असावी अशी इच्छा असते. ही हौस घरातील गॅलरीत कुंड्यांमध्ये फुलझाडे लावून पूर्ण केली जाते. पूर्वी चाळीमध्ये घराबाहेर कुंड्यांमध्ये जास्वंद, झेंडू, मोगरा, शेवंती, गुलाब, गुलबक्षी, रातराणी, तुळस, कोरफड, सदाफुली यासारखी अनेक झाडे लावली जात असत. घरातील कुंड्यांमध्ये फुललेली जास्वंद देवाला वाहताना, […]

आंबा | King of Fruits | Mango | Mango Lover

फळांचा राजा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. ​आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा […]

स्वयंपाकघरातील औषधी रत्ने…

आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, औषधी आहार अशा अनेक प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा आयुर्वेदाची व्यवहार्यता लोकांच्या पाहण्यात, वाचनात येत आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व पटवून देण्यात वेळ आणि शब्द वाया न घालवता सरळ मुख्य मुद्यावर येऊया. ​स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांचा, स्वस्थ व्यक्तींसाठी तसेच अनेक रोग किंवा लक्षणांमध्ये कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे पाहूया. ​१. दालचिनी – […]

महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. […]

मराठी भाषेचे राज्य

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात […]

विजयी माझा श्रीहनुमान !

बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. मध्वमुनीश्र्वरांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक सुंदर पद लिहिले आहे. मध्वमुनीश्र्वरांच्या इतर रचनांप्रमाणेच हे पद्सुद्धा प्रासादिक आणि मधुर असे आहे. विजयी माझा श्रीहनुमान। अंजनीनंदन […]

सुदृढ आरोग्य- संस्कृती

अलीकडेच युरोपीय देशांत फिरण्याचा योग आला. सुंदर हिरवी कुरणे व चंदेरी हिमाच्छादित डोंगरमाथे सर्वांनाच भुलवतात. पण त्याहूनही रम्य अशी काही दृश्ये माझ्या मनावर कोरली गेली. रुंद, सहा पदरी रस्ते, पादचाऱ्यांसाठी व सायकलींसाठी स्वतंत्र लेन, शिस्तबद्ध नीरव रहदारी, सार्वत्रिक स्वच्छता आणि त्याहून सुंदर म्हणजे निर्धास्तपणे कानाला संगीत लावून जॉगिंग करीत असलेल्या सर्वसाधारण महिला! सायकली चालवत रपेट […]