आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक. […]
