साप्ताहिक राशीभविष्य – ३० जुलै २०१७ – ५ ऑगस्ट २०१७
हर्षल प्रथम, शुक्र पराक्रम, रवि-मंगळ चतुर्थ, बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-शनि अष्टम, चंद्र-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ स्थानातुन भ्रमण करणार आहेत. आपला अहंभाव बाजूला ठेवा. आपल्या कौटुंबिक कर्तव्यास प्राधान्य देण्यात तत्पर राहताना आरोग्याची योग्य काळजी घ्या ़ घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्याना मेहनत करावी लागेल. कमजोर विषयांवर अधिक मेहनत घ्यावी लागेल. बोलण्यापेक्षा अभ्यासातील कृतीकडे अधिक लक्ष द्या. प्रेमातील सावधानता लाभदायक ठरेल. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो म्हूणन आपल्या जोडिदराच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. जीवनसाथीविषयी विश्वास उत्पन्न करा. त्यांच्या भावनांची कदर करा.
शुक्र द्वितीय, रवि-मंगळ पराक्रम, बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-शनि सप्तम, चंद्र-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कुटुंबाची सर्व जबाबदारी तुमच्यावर असेल. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर वचक ठेवा. आपल्या कुशाग्र बुध्दीचा योग्य वापर केल्यास नेत्रदीपक यश परीक्षेत मिळेल. स्वत:चा अभ्यास स्वत: करण्यावर भर द्यावा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. एकमेकांच्या विचारांना योग्य संधी द्या. वैवाहिक जीवनात रस उत्पन्न करा. अहंकारास फार महत्त्व देऊ नका. जीवनसाथीच्याही भावनांचा आदर केला पाहिजे. जीवनशैलीत कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. दुसऱ्यांवर विश्वासून कृती, साहस टाळा.
शुक्र प्रथम, रवि-मंगळ द्वितीय, बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-शनि षष्ठ, चंद्र-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. शारीरिक वेदनांपासून स्वत:चा बचाव करा. सकाळचा नियमित व्यायाम व चालणे महत्वाचे आहे.़ पैशाचे फार मोठे व्यवहार करण्याची घाई करु नये. तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. बचत करण्याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्व वाढल्याने तुम्हाला विशेष सवलती बहाल केल्या जातील. नवे व्यवसायात अकारण धाडसी निर्णय घेऊ नका. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. गुप्त शत्रुंपासून आपल्याला सतत सावधानता पाळवी लागणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास ठेवा.
रवि-मंगळ प्रथम, बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-शनि पंचम, चंद्र-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, हर्षल दशम, शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. तणाव घालवण्यासाठी योगासने व प्राणायाम करावा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नातेवाईक स्वार्थी व मतलबी वृत्तीचे असतील. आपली मते कुटुंबावर लादू नका. कौटुंबिक कर्तव्य पुर्ण करा. आर्थिक व्यवहार सांभाळून करावयास हवेत. अर्थप्राप्तीच्या नव्या योजना आखा. नोकरीत बदल करताना काळजी घ्या. नोकरी किंवा व्यवसायात अवाजवी साहस टाळा. वरिष्ठांची मर्जी संपादन करु शकाल. शासकीय कामे या सप्ताहात उरकून घ्यावीत.
राशीस्थानी बुध-राहु, गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-शनि चतुर्थ, चंद्र-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, हर्षल नवम, शुक्र लाभ, रवि-मंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा स्थूलपणा वाढत जाईल. त्याच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करु नका. घरातील वातावरण आनंदीत ठेवा. मनात सकारात्मक भावना ठेवा. कौटुंबिक जबाबदारीचे काटेकोर पालन करा. तरुणांनी प्रेमप्रकरणे सावधपणे टाळावीत. परस्परांच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. थोडीशी तडजोड केल्यास वैवाहिक जोडिदार चांगला मिळेल. शेजाऱ्यांकडून अपेक्षित मदत मिळेल. मनोधैर्य टिकवून ठेवा म्हणजे मार्ग काढू शकाल.
आपल्या राशीत गुरु, चंद्र द्वितीय, चंद्र-शनि पराक्रम, चंद्र-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, हर्षल अष्टम, शुक्र दशम, रवि-मंगळ एकादश, बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. शारीरिक दगदग वाढेल. गरज वाटल्यास डाँक्टर बदलण्यास मागे पुढे पाहू नये. आपल्या कौटुंबिक कर्तव्यासाठी खर्चाची तयारी ठेवा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रेमाच्या माणसांशी तुटक वागू नका. प्रेमसंबंधात वाढ करण्याचा प्रयत्न करा. विवाहोच्छुकांना अपेक्षेनुसार जोडिदार मिळेल. जीवनसाथीचा विश्वास संपादन करा.़ वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शक्यतो कायद्याचे उलंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. काळानुसार बदलायला हवंच. स्वत:च्या कर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवा.
चंद्र प्रथम, चंद्र-शनि द्वितीय, चंद्र-प्लुटो पराक्रम, पंचमात नेपच्युन-केतु, सप्तमात हर्षल, नवमात शुक्र, रवि-मंगळ दशमात, लाभात बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. सकस व सात्विक आहारावर भर द्या त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविता येईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. विद्यार्थ्यांनी कोणतेही ठोकताळे न वापरता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आवडीची पुस्तके वाचून वाचनाची आवड जोपासावी. प्रिय व्यक्तीच्या मनाचा वेध घ्या. जीवलग व्यक्तीवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका. आलेल्या व्यत्ययास दुर करा. सरकारी कामे किंवा राजकीय क्षेत्रातील कामे अतिशय सावधपणे हाताळावीत.
चंद्र-शनि प्रथम, चंद्र-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, षष्ठात हर्षल, अष्टमात शुक्र, नवमात रवि-मंगळ, बुध-राहु दशमात, लाभात गुरु, चंद्र व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. प्रकृती स्वास्थ्याविषयी विनाकारण चिंता करीत बसू नका त्यामुळे उदासीनता व नैराश्य येऊ शकेल. आरोग्यासाठी योग्य व नियमित व्यायाम आवश्यक आहे. धनार्जनाच्या असलेल्या योजना मार्गी लागून त्यात सफलता मिळेल. खर्चापेक्षा बचतीकडे कल वाढवावा लागेल. घरातील सर्वाची मने जिकंण्याचा प्रयत्न करा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाला चांगले व मोठे यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नका.
आपल्या राशीत चंद्र-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, पंचमात हर्षल, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि-मंगळ, नवमात बुध-राहु, गुरु दशम, चंद्र लाभात, चंद्र-शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खर्च वाढणार नाही याची काळजी घ्यावी. बुध्दीचातुर्याची अर्थाजनाला जोड द्या. प्रेम संबंधात एकमेकांवर विश्वास ठेवा. आपल्या प्रियजनांच्या मनातील विश्वास डळमळीत होणार नाही याची दक्षता घ्या. वैवाहिक जीवनात वादविवाद टाळा. जोडीदारास मानसन्मान द्या. दुसऱ्यांना फार सभ्यता दाखविण्याच्या भानगडीत पडू नये. नोकरीसाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात चातुर्याचा वापर करा. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. आपल्या विचारात स्पष्टता ठेवा.
द्वितीयात नेपच्युन-केतु, चतुर्थात हर्षल, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि-मंगळ, अष्टमात बुध-राहु, नवमात गुरु, दशमात चंद्र, लाभात चंद्र-शनि, व्ययस्थानात चंद्र-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. सुर्य नमस्काराच्या सर्वांग सुंदर व्यायामाने आरोग्य चांगले राहू शकते. कौटुंबिक वाद वाढवु नका. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मनस्थिर ठेवा. घरातील स्री सदस्यांचा सल्ला आर्थिक लाभाचा आहे. प्रेम बंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमात नको ते धाडस करु नका. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा ़ दुसऱ्या व्यक्तीची प्रशंसा त्यांच्या समोर करणे टाळावयास हवे.
राशीस्थानी नेपच्युन-केतु, पराक्रमात हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-मंगळ, सप्तमात बुध-राहु, अष्टमात गुरु, नवमात चंद्र, दशमात चंद्र-शनि, लाभस्थानी चंद्र-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रकृतीवर कामाचा व कार्यालयीन ताण तणावाचा भार पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. नोकरदारांना कामात सुखद स्थिती अनुभवास मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे मन जिंकणे ही तारेवरची कसरत ठरेल ़ जोडीदाराशी सौम्य शब्दात बोलणे अधिक योग्य ठरेल. जीवनसाथीचा विश्वास संपादन करा]़ जागेच्या व्यवहारात नुकसान होण्याची चिन्ह असल्याने आपण ते टाळण्याचा प्रयत्न करावा. जनहितासाठी केलेल्या कामाचे कौतुक होईल.
द्वितीयात हर्षल, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-मंगळ, षष्ठात बुध-राहु, सप्तमात गुरु, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-शनि, दशमात चंद्र-प्लुटो, व्ययात केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. शाकाहार नेहमीच फायदेशीर ठरेल. घाई घाईने जेवण करणे टाळा. प्रेमात विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या. समोरील व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करा. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका. आलेल्या व्यत्ययास दुर करा. शत्रु आपल्यासमोर टिकाव धरु शकणार नाहीत. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्यास जपा. मातुल घराण्याबरोबर होणारे वादाचे विषय टाळावेत. भावनांवर नियंत्रण ठेवा व अनावश्यक तणाव बाळगू नका.