साप्ताहिक राशीभविष्य – २७ ऑगस्ट २०१७ – २ सप्टेंबर २०१७
![मेष | साप्ताहिक राशीभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Aries-1-e1492235679864-144x150.png)
हर्षल प्रथम, मंगळ-शुक्र चतुर्थ, रवि-मंगळ- बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-शनि अष्टम, चंद्र-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आहाराविहाराची बंधने पाळणे अत्यावश्यक ठरेल. उष्णतेच्या त्रासापासून सावध राहा. कुटुंब प्रमुख असल्यास कुटुंबाची सर्व जबाबदारी तुमच्यावर असेल कुटुंबातील व्यक्तीच्या मनाचा विचार करा प्रेमात गुरफटलेल्यांनी बेसावध राहू नये. गुप्त प्रेम संबंध टाळा. प्रेम प्रकरणात वाहवत जाऊ नका. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. मनात निराशेस थारा देऊ नका. वैवाहिक सौख्य वृध्दिंगत करण्यासाठी घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. खोटे दस्तावेज तयार करु नका.
![वृषभ](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Taurus-150x150.png)
मंगळ-शुक्र पराक्रम, रवि-मंगळ- बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-शनि सप्तम, चंद्र-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्यासंबंधी स्वतःशी तडजोड करणे योग्य ठरेल ज्यायोगे प्रकृती स्वास्थ्य सांभाळता येईल आपल्या कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण करून आपले कर्तव्य पार पाडा. घरातील वातावरण न बिघडविता सामंजस्याने मार्ग काढा. विद्यार्थ्यांनी मनावर संयम ठेवावा मनाला सतत चांगले शिक्षण द्या. स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. कामाचा व्याप वाढुन विविध जबाबदाऱ्या अंगावर पडतील. कोणालाही आश्वासन देऊ नका. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील धर सोड वृत्ती टाळावयास हवी.
![मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Gemini-150x150.png)
मंगळ-शुक्र द्वितीय, रवि-मंगळ- बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-शनि षष्ठ, चंद्र-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. भोजनामध्ये चटपटीत पदार्थाच्या सेवनाची सवय कमी करावयास हवी सात्विक आहारावर भर द्या संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातील आपल्या जबाबदाऱ्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आपल्या अभ्यासशैलीत आवश्यक तो सुधार करा कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर सही करु नका. या आठवडयात शत्रु आपल्या समोर टिकाव धरु शकणार नाही. यश मिळविण्यासाठी कोणतीही पळवाट घेणे टाळा. उतावळेपणाने निर्णय घेऊ नका.
![कर्क | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Cancer-150x150.png)
मंगळ-शुक्र प्रथम, रवि-मंगळ- बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-शनि पंचम, चंद्र-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, हर्षल दशमस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्याबाबत जागरुकता हवी. कोणत्याही गुढ विषयावर खोलवर विचार करु नका अशा वृत्तीने नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. मुलांकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागेल. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नका. कुटुंबासाठी खर्च केल्यास कौटुंबिक गैरसमज दूर होण्यास मदत होईल. खर्च नियंत्रित करावा. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. कामाचा उरक वाढवावा लागेल. मनातील संकल्प चिकाटीने पूर्ण करा. व्यवसायातील सातत्य टिकवा व्यापारात वृध्दीसाठी जाहीरातीचा उपयोग करा
![सिंह | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Leo-150x150.png)
राशीस्थानी रवि-मंगळ- बुध-राहु, गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-शनि चतुर्थ, चंद्र-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, हर्षल नवम, मंगळ-शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. शुध्द व सात्विक आहार नियमीत घ्यावयास हवा. प्रकृती स्वास्थ्यासाठी सकाळी फिरायला जा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मनाजोगता पैसा मिळून धनसंचय करता येईल. घरामध्ये इतरांनी आपले ऐकलेच पाहिजे असा आग्रह टाळा. भावडांशी काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नातेवाईकाना ढवळाढवळ करुन देऊ नका. प्रेम बंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एक दुसऱ्यामधील असलेले मतभेद विसरणे अगत्याचे आहे. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा
![कन्या | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Virgo-e1492239041833-146x150.png)
आपल्या राशीत गुरु, चंद्र द्वितीय, चंद्र-शनि पराक्रम, चंद्र-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, हर्षल अष्टम, मंगळ-शुक्र एकादश, रवि-मंगळ- बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. स्वत:च्या तब्बेतीची जोपासना करा. आपली अतंर्गत घुसमट न होण्यासाठी आपले मत दुसऱ्या कोणाकडे तरी मोकळे करा. अर्थनियोजनाचे आराखडे यशस्वी होतील. काटकसरीचे धोरण ठेवा. घरातील वातावरण चांगले राहील. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या आयु्ष्यात ध्येय व उद्देश ठरवायला शिकवा. अचूक निर्णयक्षमतेचा विकास करण्यावर भर द्यावयास हवा. आपल्या अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. कोणाकडून अधिकची अपेक्षा करु नये.
![तूळ | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Libra-150x150.png)
चंद्र प्रथम, चंद्र-शनि द्वितीय, चंद्र-प्लुटो पराक्रम, पंचमात नेपच्युन-केतु, सप्तमात हर्षल, मंगळ-शुक्र दशमात, लाभात रवि-मंगळ- बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. रेंगाळलेले काम पूर्ण करण्यांची संधी मिळेल. कामाचा चांगला मोबदला मिळेल.व्यवसायिकांना एखादे महत्वाचे काम विशिष्ट मंजूरीसाठी अडून राहिले असेल तर ती मिळू शकेल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मन स्थिर ठेवा. कोणापुढे पैशासाठी हात पसरु नका. प्रिय व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांना आपल्या मदतीचा हात पुढे करा. योग्य प्रसंगी भेटवस्तु देणे हितावह ठरेल. अडलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपले कार्यक्रम ठरवून तुम्ही स्वत:ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा.
![वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Scorpio-150x150.png)
चंद्र-शनि प्रथम, चंद्र-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, षष्ठात हर्षल, नवमात मंगळ-शुक्र, रवि-मंगळ- बुध-राहु दशमात, लाभात गुरु, व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. नोकरीत नविन उपक्रम हाती येतील. सरकारदरबारी असणारी कामे पूर्ण करण्यात समाधानकारक यश मिळेल. मनातील संकल्प चिकाटीने पूर्ण करा. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील सातत्य टिकवा घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. आईवडीलांच्या आरोग्यासाठी प्राधान्य द्या. अत्यावश्यक वस्तुंची खरेदी जेव्हा गरज भासेल तेव्हाच करा. कोणताही व्यवहार उधार-उसनवारीवर करु नका. कर्ज घेणे टाळावयास हवे. इतरांचे सल्ले मर्यादेपर्यंत स्वीकारावेत.
![धनु | साप्ताहिक राशीभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Saggitarius-150x150.png)
आपल्या राशीत चंद्र-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, पंचमात हर्षल, अष्टमात मंगळ-शुक्र, नवमात रवि-मंगळ- बुध-राहु, गुरु दशम, चंद्र लाभात, चंद्र-शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. नोकरी क्षेत्रात जबाबदारीपासून अलिप्त राहू नका. प्रगतीचा वेग नियोजन कौशल्यामुळे आपणास ठेवता येईल. व्यवसायात सातत्य हवे. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करु नये. प्रेम प्रकरणात पुढे जाताना एक दुसऱ्यावरील दृढ विश्र्वास महत्वाचा असतो. आपसातील तणाव टाळण्याचा प्रयत्न करणे दोघांच्या हिताचे आहे. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. घरामध्ये वातावरण आनंदी व उत्साही असेल. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा.
![मकर | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Capricon-1-150x150.png)
द्वितीयात नेपच्युन-केतु, चतुर्थात हर्षल, सप्तमात मंगळ-शुक्र, अष्टमात रवि-मंगळ- बुध-राहु, नवमात गुरु, दशमात चंद्र, लाभात चंद्र-शनि, व्ययस्थानात चंद्र-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. अकारण चिंता करण्याचे टाळा अशा वृत्तीने प्रकृत्ती स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकेल. घरातील वातावरण सौम्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावयास हवे. घरातील प्रश्न सर्वांच्या सहकार्य व विचाराने सोडवा. छंदासाठी जास्त वेळ न देता अभ्यासात लक्ष द्या. मनाची धरसोड वृत्ती नको अशा वृत्तीने अभ्यासात बाधा येईल. सहकाऱ्यांना विश्वासात घ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी शक्य होतील. मित्र-सहकारी व आप्तस्वकीयांचे उत्तम सहकार्य राहील. जुनी वसुली करताना हितसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या.
![कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Aquirus-150x150.png)
राशीस्थानी नेपच्युन-केतु, पराक्रमात हर्षल, षष्ठात मंगळ-शुक्र, सप्तमात रवि-मंगळ- बुध-राहु, अष्टमात गुरु, नवमात चंद्र, दशमात चंद्र-शनि, लाभस्थानी चंद्र-प्लुटो असे ग्रहमान असतील. कामात तुमच्यावर अधिक जबाबदारी येईल. थोडयाशा कष्टाने आपण ती जबाबदारी पाडू शकता. मेहनतीने सर्व काही प्राप्त होईल. प्रेम सबंधात जोडिदारांकडुन जास्त अपेक्षा करु नका. प्रेमातील जोडिदाराला समजुन घेणे गरजेचे आहे. एकमेकांमधील गैरसमज टाळा. वैवाहिक जीवनात आलेल्या व्यत्ययास दुर करा. विद्यार्थ्यानी रुक्षपणा झटकून टाकावा. उज्वल यशाची खात्री करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करुन घ्यावे. स्पर्धा, साहस, प्रलोभने यांपासून दूर रहावे. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. गोड बोलून कार्यभाग साधा.
![Pisces | Kalnirnay Horoscope](https://www.kalnirnay.com/wp-content/uploads/2017/01/Horoscope_Icons_Piscus-1-150x150.png)
द्वितीयात हर्षल, पंचमात मंगळ-शुक्र, षष्ठात रवि-मंगळ- बुध-राहु, सप्तमात गुरु, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-शनि, दशमात चंद्र-प्लुटो, व्ययात केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. शुध्द सात्विक व चौरस आहार ही निरोगी जीवनाची किल्ली आहे. नियमित साधा समतोल आहार यामुळे बऱ्याच अंशी शरीर निरोगी राखता येते. घरातील कौटुंबिक मतभेद सोडविण्याची जबाबदारी तुमच्याकडे येईल. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात भावनेचा उद्रेक झाल्यास समजूत काढणे कठीण जाईल वैवाहिक जीवनसाथी भावूक, संवेदनाशील व अचानकपणे विचारात बदल येणारा असेल. त्यांच्या भावना समजावून घ्या.