साप्ताहिक राशीभविष्य – २ एप्रिल ते ९ एप्रिल २०१७
मंगळ-बुध-हर्षल प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ, रवि-शुक्र-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. सर्व प्रकाराच्या सकारात्मक गोष्टी घडून आनंद मिळेल. रागावर वेळीच नियंत्रण ठेवावे. पथ्यपाणी नीट सांभाळल्यास आरोग्यस्वास्थ टिकेल. घरात शांतीपूर्ण वातावरण राहिल. घरात मंगलकार्याचा छान योग जुळेल.प्रेमात नको ते धाडस करु नका. वैवाहिक जीवनात विचारांची पारदर्शकता राहिल्यास वाद कमी होतील. अभ्याससहजासहजी होणार नाही,विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक तो केला पाहिजे.इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या.
चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, रवि-शुक्र- हर्षल लाभ, मंगळ-बुध- हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात जबरदस्त प्रगती होईल. विद्यार्थी स्वत : ठरवून घेतलेले उद्दिष्ट पूर्ण करु शकतील. नोकरीमध्ये तुमच्या कामात कोणत्याही कारणाने दुर्लक्ष झाल्यास वरिष्ठांना राग येईल. नोकरदार वर्गानी आपल्या अपेक्षा अनावश्यक वाढवू नये. नवीन उद्योग सुरु करण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा. धंदा, व्यवसायात गुंतागुंतीच्या कामाचा संबंध येईल. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. घर बदलण्याचे विचार मुळीच करु नयेत. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्युन- केतु नवम, रवि-शुक्र-हर्षल दशम, मंगळ- बुध-हर्षल लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. नोकरीमध्ये छुप्या स्पर्धकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात अचानक होणाऱ्या बदलांची दखल घ्या. व्यवसायातल्या जोडिदारावर अतिरिक्त विश्वास ठेऊ नका. सरकारी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी जोरात सुरु करावी. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा, ताण विसरा. लोकांना बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्या. शुभकार्य तुमच्या हातून पूर्ण होईल. गोड आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहा.
चंद्र प्रथम, चंद्र-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि- प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, रवि-शुक्र-हर्षल नवम, मंगळ-बुध-हर्षल दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. अनारोग्य ओढावल्यास योग्य वेळीच तपासणी व औषधोपचार करावेत. पथ्य व योगाभ्यास याकडे लक्ष द्या. मानसिक समतोल ढळू देऊ नका. काही घरगुती समस्यांमुळे मन थोडे गोंधळात राहील तेंव्हा जास्त काळजी करु नका. वडिलमाणसांच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रेमात गुरफटलेल्यांनी बेसावध राहू नये. जोडिदाराला समजून घेणे गरजेचे आहे. पती- पत्नींनी आपल्या वागण्यात पारदर्शकता ठेवावी म्हणजे गैरसमज होणार नाहीत. आपली जबाबदारी ओळखून वागण्याचा काळ आहे
राशीस्थानी चंद्र-राहु, गुरु द्वितीय, शनि- प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, रवि-शुक्र-हर्षल अष्टम, मंगळ- बुध-हर्षल नवम, चंद्र दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. प्रकृतीच्या बाबत चालढकलपणा योग्य ठरणार नाही. जुनी दुखणी वर डोके काढण्याची शक्यता असते तेव्हा जपा. थांबलेला व उधार दिलेला पैसा मिळेल. मोठया आर्थिक व्यवहारात तज्ञांचा सल्ला फायदेशीर तरेल. हातातील पैशाचा काटकसरीने वापर करा. प्रेमात विश्चासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या. प्रेमात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्याकडे कल ठेवा. आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा.
आपल्या राशीत गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, रवि-शुक्र- हर्षल सप्तम, मंगळ- बुध- हर्षल अष्टम, चंद्र नवम, चंद्र दशम, चंद्र लाभ, चंद्र-राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. अति आत्मविश्वासामुळे काही अपघाती प्रसंग ओढवून घेऊ नये. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. थोडयाफार अडचणी येतील पण आपण त्यावर उत्तम मात करु शकाल. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो अशावेळी त्यांच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. एकमेकांबद्दल विश्वासार्हता वाढवणे जरूरीचे आहे. पती-पत्नीनी एक दुसऱ्याच्या आवडी निवडीकडे लक्ष द्यावयास हवे. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. जोडीदाराचा हट्टीपणा, लहरीपणा याला वेळोवेळी तोंड द्यावे लागेल. आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.
पराक्रमात शनि- प्लुटो, पंचमात नेपच्युन-केतु, रवि- शुक्र-हर्षल षष्ठ, मंगळ- बुध-हर्षल सप्तमात, चंद्र अष्टमात, चंद्र नवमात, चंद्र दशमात, चंद्र- राहू लागात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. आपल्याला प्रकृतीच्या छोटया-मोठया तक्रारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करणे टाळावयास हवे. आरोग्यासाठी बाहेरील पदार्थ वर्ज्य करा. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात भरपूर तयारी करावयास हवी. विद्यायोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून राहिल. नोकरदारांना वरचा दर्जा लाभेल. रोजगाराची नवीन संधी सहजगत्या उपलब्ध होईल. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. धंद्यात काही निर्णय घेताना जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच चला. एखादा छोटा उद्योगही आपण भरभराटीला आणू शकता.
द्वितीयात शनि- प्लुटो, चतुर्थात नेपच्युन-केतु, पंचमात रवि-शुक्र-हर्षल, षष्ठात मंगळ-बुध- हर्षल, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र, चंद्र-राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. आरोग्याच्या संवर्धनासाठी व्यायामाला खास प्राधान्य द्या. आहार-विहाराचे नियम पाळा. ताण तणावांना दूर ठेवा. चिंता करणे सोडा. कुटुंबात भांडणापासून लांब राहा. संततीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करा. वेळच्या वेळी आणि शिस्तबद्ध अभ्यास केल्यास नवीन अभ्यासक्रमात त्याचा चांगला फायदा होईल. वाचन आणि लेखन यावर आधीपासून मेहनत घ्यावी. नोकरीत नवीन साहस आपण होऊन अंगावर घेऊ नका पण जबाबदारी आल्यास ती नाकारुही नका. नव्या व्यवसायासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन- केतु, चतुर्थात रवि-शुक्र-हर्षल, पंचमात मंगळ-बुध- हर्षल, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-राहु, गुरु दशमात अशी ग्रहांची रचना असेल. आर्थिकदृष्टया कोणत्या ना कोणत्या प्रकारे आर्थिक आवक राहील. कोणाला दिलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोरामोठयांची मदत घ्यावी, वाद वाढवू नयेत. दुसऱ्यांच्या आश्वासनावर विसंबून महत्वाचे निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींकडे लक्ष देऊन कामे करणे हितावह ठरेल. नोकरीत बढती मिळण्याचा किंवा बदली चांगल्या ठिकाणी मिळण्याचा योग आहे. वरिष्ठ नवीन जबाबदारी अंगावर टाकतील. उद्योगधंदाच्या ठिकाणी कामे मनासारखी होतील.
द्वितीयात नेपच्युन- केतु, पराक्रमात रवि- शुक्र- हर्षल, चतुर्थात मंगळ-बुध- हर्षल, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र-राहु, नवमात गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. ताण तणावाला दोन हात लांब ठेवणे हितकर होईल. आरोग्य राखण्यासाठी कामामधून वेळ काढा व व्याधी निवारण करा. लोभामुळे आर्थिक संकट ओढवून घेऊ नका. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नयेत. कौटुंबिक तणाव निवळण्यासाठी स्वत : च्या वागण्या- बोलण्यात तारतम्य ठेवावे. जाणकारांच्या सल्ल्यानेच वास्तुचे व्यवहार फायदेशीर होतील. नकारात्मक विचारांना दूर सारा. थोर व्यक्तींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या. कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर सही करु नका.
राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात रवि- शुक्र-हर्षल, पराक्रमात मंगळ- बुध-हर्षल, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र- राहू, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. घरातील मोठया व्यक्तीला विचारल्याशिवाय एकदम कुठले धाडस करु नये. मुलांना स्वत: वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा. मुलांची जिज्ञासू व शोधकवृत्ती वाढवा. अभ्यासात कंटाळा आळस करून अभ्यासातील सातत्य बिघडवू नये. शिक्षणातील चंचलता कमी करावी. इतरांशी सल्ला मसलत केली तरी स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यावेत. आवाक्याबाहेरची कामे प्रयत्नाने उरकून घ्यावीत. वाद- विवाद करण्यात वेळ वाया घालवू नये. मित्रांपासून सावध रहा.
आपल्या राशीत रवि-शुक्र-हर्षल, द्वितीयात मंगळ-बुध-हर्षल, पराक्रमात चंद्र, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र- राहू, सप्तमात गुरु, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रकृतीच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करु नका. खाण्यापिण्याच्या अतिरेकाने आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. कुटुंबातील एकोपा जपण्याकडे लक्ष द्या. घरात व बाहेर दोन्ही आघाडयांवर धैर्याने तोंड द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास अडथळे कमी होतील. शत्रू आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाहीत. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालविताना फार सावधानता बाळगा. आता मागे वळून पाहू नका. भूतकाळाचा विचार करु नका.