साप्ताहिक राशीभविष्य – ०१ मे ते ०६ मे २०१७
रवि-बुध-हर्षल प्रथम, मंगळ द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ, शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. रागावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. आरोग्याच्या संवर्धनासाठी व्यायामाला खास प्राधान्य द्या. आहार-विहाराचे नियम पाळा. आर्थिक उलाढाल्या विचारपूर्वक करा. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मनस्थिर ठेवा. कुटुंबाबद्दल सहानुभूती असेल. सांसरिक जीवनातील चांगल्या घटनांचा आस्वाद मिळेल. विद्यार्थ्यांनी अपयशाची कसर भरुन काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी. केवळ अभ्यास हेच आपले ध्येय डोळयांपुढे ठेवा. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. स्वत:ची बुध्दी जागृत ठेवा. कुणाची मदत मिळेल या आशेवर राहू नका.
मंगळ प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, शुक्र लाभ, रवि-बुध-हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. तुम्हाला खर्चाचा अंदाज अगोदर ठेवणे व त्यानुसार वागणे हितावह ठरेल. पैशाचे मोठे व्यवहार तज्ञांच्या सल्लानेच करावेत. लहान मुलांचा स्वभाव हळवा असल्यामुळे त्यांना योग्य अशी दाद द्या. कुटुंबातील आपली एकरुपता काहीशी कमी जाणवत आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. लेखी व्यवहार करार योग्य मार्गाने तडीस जातील. स्वत:ची कामे शक्यतो स्वत:वेळेवर करा.
चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, शुक्र दशम, रवि-बुध-हर्षल लाभ, मंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मंगलकार्याचे वारे वाहू लागतील. मित्र परिवार नातेवाईकांना मदत करण्याची संधी मिळेल. आपल्या शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे वाद विवाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारचे करार शक्यतो न करणे उत्तम होईल. नोकरीत कर्तव्य करावे, इतरांना सुधारणा करण्यासंबंधी उपदेश देत बसू नये. नोकरीत स्वत:च स्थान निर्माण कराल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार देतील. दिलेला शब्द पाळावा लागेल. जबाबदारीचे ठिकाणी चुका होणार नाही याची काळजी घ्यावी.
चंद्र प्रथम, चंद्र-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, शुक्र नवम, रवि-बुध-हर्षल दशम, मंगळ लाभ, चंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्य सांभाळून आपण काम करावे. आरोग्याच्या संवर्धांनाकडे लक्ष द्या. आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या मनाचा विचार करा. कौटुंबिक वाद वाढवू नका. आपल्या कर्तव्यपूर्तीत दिरंगाई करु नका. व्यवहारात अर्थाजन कसे होईल याचा विचार करा. थोडयाशा कठोर वागण्याने अशी येणी मिळवता येतील. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.परिस्थितीपुढे माघार न घेता तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवलात तर मार्ग निघू शकेल.
राशीस्थानी चंद्र-राहु, गुरु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, शुक्र अष्टम, रवि-बुध-हर्षल नवम, मंगळ दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मुलांच्या बाबतीत अधिक जागृक रहावे लागेल. आपल्या प्रियजनांच्या मनातील विश्वास डळमळीत होणार नाही याची दक्षता घ्या. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम संबंधात भावनांचा अतिरेक होता कामा नये. जोडिदाराच्या भावनांशी खेळल्यास विश्वासाला तडा जाईल. वैवाहिक जीवनात कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या. विवाहासंबंधी निर्णय स्थगित ठेवा. कामासाठी नातेवाईकांबरोबर दूर जावे लागेल. स्वत:च्या अडीअडचणीचा इतरांकडून फायदा उठवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
आपल्या राशीत गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, शुक्र सप्तम, रवि-बुध-हर्षल अष्टम, मंगळ नवम, चंद्र दशम, चंद्र लाभ, चंद्र-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कोठलाही आजार किंवा दुखणी अंगावर काढू नयेत. वेळेवर उपचार केले तर मोठमोठे रोगही दूर ठेवता येतात. विद्यार्थ्यांना यशाकरता जास्त मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना शाँटकर्ट घेऊन चालणार नाही. स्वत:च्या बोलण्यामुळे व्यक्ती संबंध बिघडणार नाही यांची काळजी घ्यावी. घरगुती कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावे लागेल. स्वतःचे म्हणणे खरे करण्यापेक्षा शांत राहा. व्यवहारात, कायद्यात चोख राहा. सामाजिक प्रतिसाद वाढता राहिल. कोणाकडून अधिकची अपेक्षा करु नये.
पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात नेपच्युन-केतु, शुक्र षष्ठ, रवि-बुध-हर्षल सप्तमात, मंगळ अष्टमात, चंद्र नवमात, चंद्र दशमात, चंद्र-राहु लाभात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. आपणास शाकाहार फायदेशीर ठरेल. कामाचा ताण मनास व शरीरास बाधक ठरणार नाही याची दक्षता घ्या. संततीच्या चुकांमुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना योग्य मान द्या. कौटुंबिक निर्णयाबाबतीत सल्ला व चर्चा केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ गोष्टींवरुन वाद विवाद टाळावेत. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. विकासाच्या वाटेवर थांबू नका. पुढे चालत राहा.
द्वितीयात शनि-प्लुटो, चतुर्थात नेपच्युन-केतु, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-बुध-हर्षल, सप्तमात मंगळ, चंद्र अष्टमात, चंद्र नवमात, चंद्र-राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. खाण्याच्या वेळा निश्चित ठेवणे आरोग्यास हितकारक असते. औषधोपचार चालू असतील तर योग्य वेळी औषधे घ्या. आहारविहाराचे नियम पाळा. सात्विक आहार ठेवा. नीट नियोजन करुन धनार्जनासोबत धन संचय करा. उधार उसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाही. कुटुंबात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना आपलेसे करुन पुढे वाटचाल करा. मोठया लोकांच्या ओळखी होऊन त्यातून फायदा मिळेल. अति आत्मविश्वास बाजूस ठेवून योग्यवेळी योग्य धोरण राबवणे हिताचे ठरेल.
आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-बुध-हर्षल, षष्ठात मंगळ, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र,नवमात चंद्र-राहु, गुरु दशमात अशी ग्रहांची रचना असेल. कुटुंबातील सलोखा व एकोपा टिकवून ठेवण्यास यश येईल. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नक्की नोकरी लागेल. नोकरीत प्रमोशनमुळे रुबाब वाढणार आहे पण जबाबदाऱ्याही वाढतील. नवा व्यवसाय सुरु करता येईल. व्यवसायातील अडथळे परिश्रमाने दूर करता येतील. कोणताही पेपर व्यवस्थित वाचल्याशिवाय त्यावर सही करु नये किंवा त्याला समंती देऊ नये.
द्वितीयात नेपच्युन-केतु, पराक्रमात शुक्र, चतुर्थात रवि-बुध-हर्षल, पंचमात मंगळ, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र-राहु, नवमात गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. आपल्या आरोग्यावर ताण पडेल असे काम टाळावयास हवे. प्रकृतीची उपेक्षा करु नका. बाहेरील खाण्यापेक्षा घरगुती जेवण तसेच फलाहारावर भर द्या. खर्चाच्या अनेक वाटांवर नियंत्रण आणावे लागेल. भवितव्याविषयी तरतूद करून ठेवावी लागेल. कौटुंबिक जीवनात वादावादी किंवा काही किरकोळ खटके निर्माण होऊ शकतात. घरातील वाद घरातच सोडवा. वडीलधाऱ्या मंडळीचा वेळोवेळी सलॢा घेणे नेहमीच लाभदायक होईल. सरकारी कामांना चालना मिळेल. विरोधकांना संधी देऊ नका.
राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात शुक्र, पराक्रमात रवि-बुध-हर्षल, चतुर्थात मंगळ, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र-राहु, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिशाहीन न होता जिद्द ठेवावी. स्वत:च्या छंदाकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही हे विद्यार्थ्यांनी नीट ध्यानात ठेवावे. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. पैशाचा सततचा ओघ लक्षात घेता भविष्यकालीन योग्य गुंतवणूक हितकारक आहे. अर्थाजन वाढविण्यासाठी केलेले विविध तर्क तुम्हास लाभाचे होतील. जास्त कोणास मदत करण्याच्या भानगडीत पडू नये. इतरांच्या सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच मर्यादेत ठेवणे.
आपल्या राशीत शुक्र, द्वितीयात रवि-बुध-हर्षल, पराक्रमात मंगळ, चतुर्थ चंद्र, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र-राहु, सप्तमात गुरु, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. ताण तणावाला दोन हात लांब ठेवणे हितकर होईल. स्वतःस जास्त दगदग करुन घेऊ नका. सामाजिक क्षेत्रात सेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होईल. घरातील माणसांची मने सांभाळा. तुम्हास गोड आश्वासन देणाऱ्या नातेवाईकांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे. हिशेब आणि हिशेबीपणा ठेवला तर आपण खूप काही करु शकाल. तुमच्यातील चांगल्या गुणांची पारख इतरांकडून होईल. स्पर्धा, साहस, प्रलोभने यांपासून दूर रहावे. गोड बोलून कार्यभाग साधा.
मासिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली