लिपिकार बापू वाकणकर – व्यक्ती आणि कार्य
सुमंगल प्रकाशन प्रकाशित आणि मुकुंद वासुदेव गोखले लिखित–संपादित हे पुस्तक म्हणजे लिपिकार स्व.लक्ष्मण श्रीधर उर्फ बापू वाकणकर यांचा परिचयात्मक ग्रंथ आहे. लिपिशास्त्राकडे वैज्ञानिकदृष्टीकोनातून बघणारे आणि देवनागरी लिपीला संगणकावर आणण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या वाकणकरांचे व्यक्तिमत्वच विलक्षण असे होते. संगणकावर देवनागरी लिपी आणण्यासाठीत्यांनी केलेले प्रयोग, त्यांचे संशोधन, त्यांची शोधवृत्ती, मुद्रणप्रणालीत त्यांनी विकसित केलेली त्यांची स्वतःची पद्धत आणि भाषावृद्धी करण्यात त्यांनी दिलेले योगदान या पुस्तकातून प्रथमचवाचकांसमोर आले आहे. कलावंत, शास्त्रज्ञ आणि उद्योजक या तिन्ही भूमिकांमधून वावरलेल्या वाकणकरांच्या कार्याचा आवाका यानिमित्ताने वाचकांसमोर येत आहे. आपल्या सांस्कृतिकवारश्याकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि नवनिर्मितीची प्रेरणा हे पुस्तक देते.