ज्ञानेश्वरी चे शब्द-भांडार
‘भावार्थ दीपिका’ अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रसिद्ध होऊन आज जवळजवळ ७३० वर्षे होत आली आहेत, तरीही या ग्रंथाचे महत्त्व आजही कायम आहे. ज्ञानेश्वरी जशी जुनी होत गेली, तसे यातील काही शब्द दुर्बोध होत गेले. परिणामी, या ग्रंथाला नव्या परिभाषेची गरज भासू लागली. ही नवी परिभाषा तयार करण्याचे काम केले, श्री. रा. ना. वेलिंगकर यांनी. कोशकार वेलिंगकर यांनी तयार केलेल्या या कोशात केवळ कठीण शब्दांचा अर्थ दिलेला नाही, तर सर्व शब्द अकारानुक्रमे दिलेले आहेत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ म्हणजे संदर्भभांडारच होय! १९५९ मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ ३७ वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये कालनिर्णयने पुर्नप्रकाशित केला होता व ही प्रस्तुत पुनर्मुद्रित तिसरी आवृत्ती आता ६१ वर्षांनी पुनर्प्रकाशित होत आहे.
Reviews
There are no reviews yet.