मानसोपचार तज्ज्ञ नसेल तिथे
मानसिक आजार मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कितीतरी जणांना या आजारांमुळे वेदना सोसायला लागत आहेत. असे असूनही आरोग्यसेवकांना मात्र शारीरिक आजारांवर उपचार करणे अधिक सोपे, सोयीचे वाटते. विशेषकरून विकसनशील देशातील गाव पातळीवर काम करणारे आरोग्यसेवक, प्राथमिक आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिका, समाजसेवक आणि प्राथमिक सेवा देणारे डॉक्टर यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना प्रत्यक्ष कामात उपयोगी पडेल या उद्देशाने हे मार्गदर्शक पुस्तक तयार करण्यात आले आहे.
मानसिक आजारांची प्राथमिक स्वरूपाची माहिती दिल्यानंतर या पुस्तकात मानसिक आजारांशी संबंधित ३० वैद्यकीय (डॉक्टरी इलाज होऊ शकणाऱ्या) समस्यांचे वर्णन दिले आहे. रोगनिदान आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी पुस्तकात ‘समस्या सोडविण्या च्या तंत्राचा उपयोग केला आहे. विशिष्ट परिस्थितीत मानसिक आजार कसे उद्भवतात याबाबतचे तपशील त्या संदर्भात देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, निर्वसितांच्या छावण्या, शाळेतील आरोग्य कार्यक्रम, एड्सग्रस्त व्यक्तींसोबत आणि यासोबतच मानसिक आरोग्याचे संवर्धन करणाऱ्या उपक्रमांच्या संदर्भात प्रश्नांची सविस्तर चर्चा पुस्तकात केली आहे. सर्वसाधारण समस्यांसाठी संदर्भ/माहिती पुस्तकाच्या शेवटच्या भागात दिली आहे. हे मार्गदर्शक पुस्तक ‘आपले’ करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांची माहिती. औषधांची नावे आणि किंमती शेवटच्या प्रकरणात दिल्या आहेत तसेच भावनिक समस्यांसाठी स्थानिक भाषेतील शब्द लिहिण्याची सोयदेखील केली आहे.
या पुस्तकात आहेत:
– १५० पेक्षा अधिक चित्रे आणि केस स्टडीज
– क्लिष्टता टाळून सोपी वर्णने आणि स्पष्टीकरणे नेहमीच्या वैद्यकीय समस्यांसाठी पटकन वापरता येतील असे पलोचार्ट्स
– रोगनिदान आणि व्यवस्थापनासाठी समस्या सोडविण्याची पद्धत
– मानसिक समस्यांवरच्या साध्या उपचार पद्धती आणि औषधांच्या वापरासाठी उपयोगी मार्गदर्शन
मानसोपचार तज्ज्ञ नसेल तिथे–विक्रम पटेल– सुमंगलप्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.