कालनिर्णय दिवाळी अंक २०२४
निसर्गविनाश, हवामान बदलामुळे माणसाची विध्वंस आणि विनाशाकडे होणारी वाटचाल, ‘नोबेल’, ‘ऑस्कर’ आणि ‘बुकर’ विजेत्यांना लिहिते करणारे संपादक रॉबर्ट सिल्वर्स यांचा प्रवास, जर्मनमधील प्रतिभावंत व्यक्तींच्या गौरवशाली इतिहासाचा घेतलेला मागोवा, मराठी बालसाहित्याची झालेली पिछेहाट, वास्तववादी चित्रात व्यंगचित्राची पात्रे रेखाटणारे व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचा कलाप्रवास, दर्जेदार अभिनय आणि हस्तमुद्रांनी बैठकीची घरंदाज लावणी सादर करणाऱ्या ज्येष्ठ कलावती यमुनाबाई वाईकर यांचा प्रेरणादायी प्रवास, दिवसाच्या कोणत्याही प्रहरी मन मोहून टाकणारा राग ‘मारूबिहाग’ची सुरेल मांडणी, एरिक गिल यांनी घडवलेला परंपरा आणि आधुनिकतेचा संतुलित मेळ घालणारा ‘गिल सान्स’ हा टाइपफेस, ‘म्युनिक, बर्लिन, पॅरिस’चा रोमहर्षक प्रवास, नव्वदच्या दशकातल्या ट्रेंडसेटर दिग्दर्शक क्वेंटिन टॅरंटिनो यांचा सिनेसृष्टीतील प्रवास, तिबेटमधील सर्वात मोठे मुद्रणालय नार्थांग मॉनेस्ट्रीवर चीन आणि भारताचा असलेला पगडा, मेळघाटच्या जंगलातील गूढ, लेखक, नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा,‘पाकनिर्णय’ स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कविता, व्यंगचित्रे, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२४’ मध्ये वाचता येईल. यंदाच्या अंकाचे खास आकर्षण म्हणजे ‘लघु लघुकथा स्पर्धा’. या स्पर्धेसाठी कमाल ३०० शब्दमर्यादेच्या कथा मागवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण कवी, लेखक किरण येले यांनी केले आहे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
Reviews
There are no reviews yet.