Salgaon Aani Goa | साळगांव आणि गोवा
आम्ही साळगांवकर म्हणजे बार्देशकर. बार्देश तालुक्यातील साळगांव हे एक शेतीप्रधान गाव. मोठ्या प्रमाणात भाताची शेती या गावात होत असे, त्यावरून या गावाला ‘साळीगाव’ किंवा ‘साळगांव’ हे नाव पडल्याचे म्हटले जाते. या गावाच्या नावाचे मूळ निश्चित नसले तरी पोर्तुगीज सत्तेत येण्याआधीपासून या गावाचे नाव साळगांव असल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. या गावाच्या नावाबद्दल कितीही आख्यायिका असल्या तरी एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे पोर्तुगीज भारतात येण्याआधीपासून गोवा हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होते आणि साळगांव हे हिंदूंचे गाव होते. — जयराज साळगावकर
Reviews
There are no reviews yet.