गणेशविद्या
ल.श्री.वाकणकर लिखित ‘गणेशविद्या‘ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या ‘Ganesh-vidya : The Traditional Indian Approach to Phonetic Writing’ या जगभर वितरीत झालेल्यापुस्तकाची मराठी आवृत्ती आहे. अर्थात इंग्रजी पुस्तकानंतर जवळपास तीस वर्षांनी मराठी पुस्तक लिहिले असल्याने मधल्या काळात झालेले बदल, तीस वर्षात संकलित केलेली माहिती आणिलेखकाचे मनन–चिंतन याचे एकत्रीकरण मराठी पुस्तकात वाचायला मिळते. भारतीय लेखन कला, ध्वनी शास्त्र, भाषा विज्ञान, व्याकरण, लिप्यांचे मौलिक नियम, वस्तुनिष्ठ संदर्भ या पुस्तकातवाचायला मिळतील. लेखनकलेचा विविध अंगाने शोध घेताना वेदकाळात लेखन विद्या होती आणि ध्वन्यात्मक लेखनाचा विचार त्या काळी केलेला आढळतो असे अनेक संदर्भ वाकणकर यांनी यापुस्तकात दिले असून त्यांच्या संशोधनातून हा ग्रंथ सिद्ध झालं आहे. प्रत्येक मराठी भाषिकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.