फ्रूट पुलाव

Spread the love

फ्रूट पुलाव बनविण्याची रेसिपी –

साहित्य :


 • ३/४ वाटी तांदूळ (कोणताही सुवासिक)
 • प्रत्येकी १/४ वाटी केळी आणि सफरचंदाचे तुकडे
 • १/४ वाटी संत्र्याचा रस
 • प्रत्येकी २ लवंगा
 • वेलची
 • दालचिनी
 • २ – ३ जर्दाळू
 • ७ – ८ काजू पाकळ्या
 • तूप
 • १/२ वाटी साखर

कृती :


 1. एक टेबलस्पून तुपाची, लवंग – वेलची – दालचिनी घालून फोडणी करावी.
 2. त्यावर धुवून निथळलेला तांदूळ परतावा.
 3. सव्वा वाटी गरम पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा.
 4. अर्धा टेबलस्पून तुपावर केळी आणि सफरचंद परतावे.
 5. दोन-तीन मिनिटे झाकण ठेवावे. त्यात अर्धी वाटी साखर घालावी.
 6. मिश्रण पातळ झाले की, भातावर ओतावे. गरजेनुसार संत्र्याचा रस घालावा.
 7. शिते मोकळी राहतील आणि भात नीट शिजेल इतपत रस घालावा.
 8. पातेल्याच्या खाली तवा ठेवून बारीक गॅसवर भात शिजू द्यावा.
 9. हा भात गार किंवा गरम कसाही छान लागतो.

– कांचन बापट | कालनिर्णय स्वादिष्ट नोव्हेंबर २०१७