सिट्रस सनशाईन

साहित्य :


  • ५०० मिली संत्र्याचा रस
  • २५० मिली पेरूचा रस
  • चवीपुरते काळे मीठ
  • २ चमचे मध
  • ६-७ लिंबाच्या फोडी
  • १५-२० पुदिन्याची पाने
  • चवीपुरते मीठ
  • बर्फाचे तुकडे
  • वॉटर सोडा

कृती:


  • प्रथम एका भांड्यात लिंबाच्या फोडी, काळे मीठ, साधे मीठ, मध आणि पुदिन्याची पाने एकत्र क्रश करून घ्यावी.
  • त्यात संत्र्याचा रस, पेरूचा रस घालून एकत्र करून घ्यावे.
  • हा एकत्र केलेला रस एका ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये तीन-चार बर्फाचे तुकडे आणि हलक्या हाताने वॉटर सोडा घालावा.
  • वरून लिंबे आणि संत्र्याच्या फोडीचे सजावट करून सिट्स सनशाईन पिण्यास द्यावे.

  – कालनिर्णय स्वादिष्ट एप्रिल २०१६